मनपा शाळेच्या शिक्षकांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे धडे

0

मागदर्शन कार्यशाळा : 35 माध्यमिक शिक्षकांसह मराठी व उर्दू 200 शिक्षक उपस्थित

जळगाव : महानगरपालिकेतर्फे मनपा शाळेतील शिक्षक -मुख्यध्यापकांसाठी गुणवत्ता पुर्ण शिक्षणाचे धडे देण्यासाठी शुक्रवारी मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन क रण्यात आले होते. सकाळी 8.30 वाजता शिक्षण सभापती सचिन पाटील यांच्याहस्ते कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले. क ार्यशाळेला कराड येथील आदर्श शिक्षक अर्जून कोळी यांचे मार्गदशन लाभले. याप्रसंगी मनपा आयुक्त डॉ. उदय टेकाळे, उपायुक्त अजित मुठे, प्रशासन अधिकारी श्री. रामोळे, विवेक अडवाणी आदी उपस्थित होते.

स्कॉलरशिप परीक्षा पास होणार्‍यास दहा हजारांचे बक्षीस

या कार्यशाळेला 35 माध्यमिक शिक्षकांसह मराठी व उर्दु 200 मनपा शिक्षक उपस्थित होते. दरम्यान उपायुक्त अजित मुठे यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले की, यशस्वी होणारे व्यक्ती वेगळे काही करीत नाही मात्र, ते कोणतेही क ाम करतांना वेगळ्या पध्दतीने क रीत असतात असे मत त्यांनी व्यक्त केले. तसेच वेगळ्या व्यक्ति मत्वाचे उत्तम उदाहरण अर्जून क ोळी यांच्या माध्यमातून आपल्या समोर उभे असल्याचेही उपायुक्त मुठे यांनी सांगितले. दरम्यान, शिक्षक संदीप बांगर, सौ. कापसे, सौ. पगारे यांनी देखील मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन हरिषचंद्र सोनवणे यांनी केले तर, आभार विवेक अडवणी यांनी केले. त्यानंतर अर्जून कोळी यांनी स्का ॅलरशिप मध्ये यादीत आलेल्या विद्यार्थ्यांला 10 हजार रुपयांचे बक्षीस देणार असल्याचे जाहीर के ले.

शिक्षकांना दिल्या टीप्स

अर्जून कोळी यांनी कराड नगरपा लिकेच्या शाळेत गुणवत्तापुर्ण शिक्षणाचे धडे देण्यास सुरुवात के ली व 130 विद्यार्थी असलेल्या शाळेची पटसंख्या 2000 विद्यार्थ्यां पोहचवली. त्यांनी जळगाव महापा लिकेच्या शाळेतील शिक्षकांना गुणवत्ता पुर्ण शिक्षणाविषयी विविध टीप्स देवून मार्गदशन केले. न.पा., मनपा शाळांकडे लोकांचा पहाण्याचा दुष्टीकोण बदलण्यासाठी शिक्षकांनी विविध उपक्रम राब विण्याची गरज असल्याचे श्री क ोळी यांनी सांगितले. तसेच पालक सभा घेवून पालकांना आपल्या शिक्षण पद्धतीचे महत्व पटवून दिले पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त के ले.

Copy