मनपा वाहनचालकाचा हृदयविकाराने मृत्यू

0

जळगाव । महानगर पालिकेत सहा दिवसापूर्वीच अस्थायी कर्मचारीवरून कायम वाहनचालक म्हणून नियुक्ती मिळालेले वाहनचालक विजय दशरथ सोनवण यांचा आज दुपारी 2 वाजता हृदयविकाराने मृत्यू झाल्याची दुःखद घटना बुधवार 27 एप्रिल रोजी घडली. महापालिकेत गेल्या अनेक वर्षापासून अस्थायी पदावर असलेल्या वाहनचालकांना शासकीय सेवेत सामावून घेण्याचा निर्णय 11 एप्रिल रोजी शासनाने दिला. 92 अस्थायी वाहनचालक शासकीय सेवेत समावून घेण्याचा निर्णय देवून अस्थायी वाहन चालकांना मोठा दिलासा दिला मिळाला आहे.

पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद
महापालिकेत 92 वाहनचालक 23 ते 30 वर्षापासून अस्थायी स्वरूपात सेवा करत होते. त्यानुसार 92 अस्थायी वाहन चालकांपैकी त्यांच्या सेवाज्येष्ठतेनुसार 50 वाहनचालकांची सेवा नियमित करण्याचा आदेश राज्य शासनाने दिला आहे. यात विजय सोनवणे यांनाही अस्थायीवरून कायम स्वरूपाच्या वाहनचालक पदावर 20 एप्रिल रोजी बांधकाम विभागाच्या युनिट क्र. 1 मध्ये नियुक्ती देण्यात आली होती. ते आज दुपारी ड्युटीवरून 2 वाजता त्यांच्या गेंदालाल मिल येथील घरी जात असतांना चक्कर येवून खाली पडले. त्यांना तात्काळ खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. यानंतर विजय सोनवणे डॉक्टरांनी यांना जिल्हा सामन्य रुग्णालयात दाखल केले असता त्यांना मृत घोषित करण्यात आले. या प्रकरणी सीएमओ डॉ. कुरकुरे यांच्या खबरीवरुन शहर पोलिस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.