मनपा पोटनिवडणुकीसाठी 5 उमेदवारांचे 9 अर्ज

0

जळगाव । जळगाव महापालिकेच्या प्रभाग 24 (अ) च्या पोटनिवडणुकीसाठी आज सोमवारी अखेरच्या दिवशी 5 उमेदवारांनी 9 अर्ज दाखल केलेत. महापालिकेतील भाजप वगळता सर्वच पक्षांनी शिवसेनेच्या उमेदवार माजी महापौर आशा कोल्हे यांना समर्थन दिले आहे. निवडणुक बिनविरोध करण्यासाठी मनसे, खाविआकडून प्रयत्न केले जात आहे. भाजपाने मात्र उमेदावार कायम ठेवण्याची तयारी केली आहे.

आशा कोल्हे यांचा बिनविरोधसाठी प्रयत्न
प्रभाग 24 (अ) मधील मनसेच्या नगरसेविकास मंगला चौधरी यांनी पक्षाच्या व्हीपचा अनादर केल्याने त्यांना अपात्र घोषीत करण्यात आले. त्यामुळे या प्रभागासाठी पोटनिवडणुकीची प्रक्रीया सुरु करण्यात आली आहे. आज सोमवारी (दि.3) अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी अतिंम वेळेपर्यंत 5 उमेदवारांचे 9 अर्ज दाखल करण्यात आले आहेत. त्यात अनिता शंकर चौधरी (अपक्ष/भाजप) यांचे 2 अर्ज, मनिषा शैलेंद्र ठाकूर (अपक्ष) 1अर्ज, आशा दिलीप कोल्हे (शिवसेना/अपक्ष) 2 अर्ज, आश्विनी केतन चौधरी ( भाजप/अपक्ष) 2 अर्ज, सरला मच्छिंद्र चौधरी (भाजप/अपक्ष) 2 अर्ज दाखल केले आहेत. माजी महापौर आशा कोल्हे यांनी शिवसेनेकडून उमेदवारी दाखल केली आहे. त्यांना सत्ताधारी खान्देश विकास आघाडी, मनसे व त्यांच्या मित्रपक्षांचे समर्थन आहे. त्यामुळे भाजपाने उमेदवार न देता बिनविरोध निवडणुक करावी अशी विनंती खाविआ व मनेसेने केली आहे. मनसेचे नेते व उपमहापौर ललित कोल्ह यांनी यासाठी जलसंपदा मंत्री गिरिष महाजन व आ. सुरेश भोळे यांच्याशी चर्चा देखिल केली आहे. यास कीतपत यश मिळते ते माघारीच्या शेवटच्या क्षणीच कळणार आहे. कोल्हे यांचा अर्ज दाखल करतांना महापौर नितिन लढ्ढा, उपमहापौर ललित कोल्हे, सुनिल महाजन, गजानन मालपुरे उपस्थित होते.