मनपा तत्कालीन अभियंता दरेवार यांच्या वर होणार गुन्हा दाखल

0

धुळे – शहराची जलवाहिनी म्हणून धुळेकरान साठी महत्वकांशी ठरणारी 136 कोटी रूपयांची पाणी पाणीपुरवठा योजनेचे काम पुनश्च वेगाने सुरू होऊन वेळेत पुर्ण व्हावे या कारणासाठी नागपुर येथे पाणीपुरवठा मंत्री मा. श्री बबनराव लोणीकर यांनी आ. अनिल अण्णा गोटे यांच्या विनंतीवरून विशेष बैठकीचे आयोजन केले होते. येत्या 16 डिसेंबर 2017 रोजी ठेकेदाराच्या कामाची मुदत संपुष्टात येणार आहे. मजीप्रा चे मुख्य अभियंता व धुळ्याचे कार्यकारी अभियंता या दोघांनी कुठल्याही परीस्थितीत आम्ही 30 नोव्हेंबर 2017 पर्यंत 136 कोटी रुपयाच्या योजनेचे काम पुर्ण करू अशी माहिती मा. लोणीकर यांना दिली आहे. व मनपा तत्कालीन अभियंता दरेवार यांच्या वर गुन्हा दाखल करण्याचे आदेश देखील देण्यात आले. बैठकीला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे मुख्य कार्यकारी अधिकारी, मुख्य तांत्रिक सल्लागार श्री लांडगे, महापालिकेतर्फे उपायुक्त श्री जाधव, कैलास शिंदे उपस्थित होते. अशी माहिती आ गोटे यांनी दिली आहे.

राजकीय नेत्याचा हस्तक्षेप
136 कोटी रूपयाची पाणीपुरवठा योजना महापालिकेकडून जीवन प्राधिकरणकडे वर्ग केल्यानंतर गेल्या 9 महिन्यात काय कामे झाली ? कुठली कामे शिल्लक राहिलीत? याचा आढावा ना लोणीकर यांनी घेतला. गेल्या 9 महिन्यात 50 कि.मी. लांबीची पाईपलाईन टाकण्यात आली असून एकूण 7 जलकुंभापैकी 2 जलकुंभाचे काम स्लॅब लेव्हलपर्यंत आले असून तिसर्‍या जलकुंभाचे काम प्रगतीपथावर आहे. 2 जलकुंभाच्या जागा जीवन प्राधिकरणच्या कामाशी संबंध नसलेल्या राजकीय नेत्यांच्या हस्तक्षेपामुळे जागा बदलाव्या लागल्या. अखेरीस तीनच दिवसापूर्वी यातून मार्ग निघाला असून येत्या आठवडाभरात या दोन्ही जलकुंभाचे काम सुरू होईल तर, उर्वरीत 2 जलकुंभाच्या उल्लेखच मूळ 136 कोटी रूपयाच्या टेंडरमध्ये नव्हता. जीवन प्राधिकरणकडे योजना सुपूर्द केल्यानंतर स्पष्ट झाले. आठवडाभरामध्ये या 2 जलकुंभांच्या कामाची स्वतंत्र निविदा काढून नंतर ठेकेदार निश्चित करता येणार आहे.

जलकुंभ नसलेल्या जागेत केली दिशाभूल
सल्लागाराने जलकुंभासाठी उपलब्ध नसलेल्या जागेवर जलकुंभ दर्शवून योजनेचे नकाशे व आखणी केल्याचे महाभयंकर सत्य चर्चेत सत्य समोर आले. मूळ नकाशात दर्शविण्यात आलेल्या परंतु जागा अस्तित्वात नसलेल्या नव्याने उभारावयाच्या जलकुंभाचे अंतर जलकुंभाच्या दर्शविलेल्या नियोजीत जागेपासून सुमारे एक ते दीड कि.मी. दूर असल्यामुळे संबंध पाईपलाईनच्याच डिझाइनची पुनश्च आखणी करावी लागेल व हायड्रोलिक प्रेशर (पाण्याचा दाब) लक्षात घेवूनच पुढील कामास सुरवात करता येईल हेही आजच्या बैठकीत निश्चित करण्यात आले.

तत्कालीन अभियंता दरेवार यांच्या वर गुन्हा
महापालिकेचे तत्कालीन अभियंता श्री दरेवार यांनी केलेल्या गैरव्यवहार व भ्रष्टाचार उघडपणे आ. अनिल अण्णा गोटे यांनी वरिष्ठ अधिकारी व मंत्र्यांसमोर वाचून दाखविला. जीवन प्राधिकरणाच्या अधिकार्‍या कडून बाजू स्पष्ट करण्यात आली. बदली केल्यानंतर तत्कालीन अभियंता श्री दरेवार एक वर्ष कामावर हजरच झाले नाही. एवढेच नव्हे तर, आमदार साहेब सांगतात ही वस्तुस्थिती पाणीपुरवठा मंत्री श्री बबनराव लोणीकर यांनी नाशिक विभागाच्या मुख्य अभियंत्यांना येत्या आठवडाभराच्या आत श्री दरेवार वर चार्जशीट तयार करून त्याच्या विरूध्द एफ.आय.आर. दाखल करण्याचे आदेश पारीत केले. महापालिकेने त्यांच्याकडे प्रलंबीत असलेली सर्व कागदपत्रे व तांत्रिक माहिती येत्या महिन्याभरात जीवन प्राधिकरणाकडे सोपवावी असे आदेशही मंत्री महोदयांनी दिले अशी माहिती