मनपा कर्मचाऱ्याचे काम बंद आंदोलन 

1
धुळे –  नोट बंदी नंतर शहरातील नागरिकांनी मोठया प्रमाणावर प्रतिसाद देत थकीत कर भरला या मुळे महापालिका मालामाल झाली . या मुळे मनपा कर्मचाऱ्याना  पैसे जमा झाल्याने आपल्या आर्थिक मागण्या पूर्ण होतील अशी अशा होती मात्र महापलिका आयुक्त संगीता धायगुडे यांना कर्मचारी संघटनेच्या वतीने  निवेदन देऊन सुद्धा चर्चा करण्यात आलेली नाही. या मुळे आयुक्त आणि कर्मचाऱ्यां मध्ये संघर्ष वाढला आहे. आयुक्ताच्या या भूमिकेचा मनपा कर्मचाऱ्यानी रोष व्यक्त केला. निवेदन दिल्याच्या सध्याकाळी प्रतिसाद न मिळाल्याने  कामबंद आंदोलन करण्यात येणार असल्याचे कर्मचारी संघटना यांनी जाहीर केले आहे.
कर्मचाऱ्या चे निवेदन 
मनपा सफाई कामगारांच्या विविध मागण्या प्रलंबित असून त्या त्वरित मंजूर कराव्या अशी मागणी करणारे निवेदन आज लाल बावटा मनपा कामगार युनियनने आयुक्तांना दिले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या 15 ते 20 वर्षांपासून रोजंदारीवर काम करणार्‍या कामगार्‍यांच्या बाजूने थेट सर्वोच्चयायालयात निकाल होवूनही त्यांना अद्याप कायम केलेले नाही. शिवाय बदली कामगारांनाही कायम केलेले नाही. मनपात 400 सफाई कामगारांच्या नविन जागा भरल्या जाणार असून यात बदली कामगारांना प्राधान्य देण्यात यावे. रोजंदारी व बदली कामगारांच्या वारसांना न्याय मिळावा 2016 च्या शासन आदेशानुसार बदली व रोजंदारी कर्मचार्‍यांना फरक देण्यात यावा. कामगारांसाठी 2 हजार रुपये, वैद्यकीय भत्त्याची मागणी केली असता महासभेने 1200 रुपये वैद्यकीय भत्ता देण्याचा ठराव केला आहे. तो पगारात लागू करावा. लाड समितीच्या शिफारशीनुसार वारसांना 1 महिन्यांच्या आत नोकरीत सामावून घ्यावा. मुकादमाच्या जागा ज्येष्ठतेनुसार भराव्यात, सफाईकामगारांना घरे बांधून द्यावीत, गणवेश, पंजे, गमबूट व साड्या देण्यात याव्या. सेवानिवृत्तच्या फंडाची रक्कम, शिल्लक रजेचा पगार, ग्रॅज्युटी 1 महिन्यांच्या आत देवून पाचव्या व सहाव्या वेतन आयोगाचा पुर्ण फरक मिळावा, सफाई कामगारांमधील पदवीधरांना पदोन्नती मिळावी आदी मागण्या या निवेदनात केल्या आहे. निवेदनावर सरचिटणीस हिरालाल सापे यांची सही असून अध्यक्ष दिलीप वाघ, उपाध्यक्ष मुन्ना शेख, हिरालाल  वाघ, खजिनदार विलास हातागळे आदींची नावे आहेत.
तत्कालीन आयुक्त भोसले बरे होते.
मनपा तत्कालीन आयुक्त भोसले याचे कर्मचाऱ्या शी असलेले नात सर्व श्रुत होते. पालिकेतील सत्ताधारी विरोधात असताना कर्मचारी मात्र आयुक्त भोसले यांच्या सोबत होते असे कर्मचारी संघटना च्या बैठकी मध्ये अनेकांनी बोलून दाखविले. अविश्वास ठराव पारित झाल्या नंतर आयुक्त भोसले याची मंत्रालयात बदली करण्यात आली. त्यांना निरोप देण्यासाठी कर्मचारी सोनगीर टोल नाक्या पर्यत पायी गेले होते. आणि त्या ठिकाणी निरोप समारंभ झाला होता. या सर्व घटनेतून तत्कालीन आयुक्त भोसले व कर्मचाऱ्या असलेले .सबंध आधोरेखील होतात. मात्र विद्यामान आयुक्त संगीता धायगुडे व कर्मचाऱ्यां घेतलेला आंदोलनाचा पवित्रा या मुळे वाद ठोकाला जाण्याची शक्यता आहे.
स्वच्छ अभियानाच्या मोहिमेवर परिणाम 
कर्मचारी आपल्या अनेक मागण्यांसाठी आंदोलन करीत असतात. मात्र काम बंद आंदोलन म्हटल्यावर संपूर्ण मनपा चे कामकाज ठप्प होते. या मुळे धुळेकर नेहमी वेठीस धरले जातात अनेक समस्या असताना त्याचा सामना देखील शहर वासियांना करावा लागतो. राज्य शासनाची स्वच्छता अभियानाची मोहीम शहरात सुरु आहे. या साठी राज्य पातळी वरीन शासनच्या वतीने राज्यातील स्वच्छ शहराची या मध्ये पडताळणी सुरु आहे. महाराष्ट्रातील स्वच्छ महापलिकाना  या मध्ये विशेष नामाकन देऊन सम्मान करण्यात येणार आहे कर्मचारी संघटनानी पुकारलेल्या आंदोलनाचा परिणाम राज्य शासनच्या सुरु असलेल्या मोहिमेवर धुळे शहरात होणार आहे. या मुळे पालिकेला शासनाच्या दरबारी आलेल्या चांगल्या संधी मुकावे लागू शकते.