Private Advt

मनपा कर्मचार्‍यांचे 23 पासून कामबंद आंदोलन

सातवा वेतन आयोग लागू करण्यासाठी संघटनांची आयुक्तांना नोटीस

जळगाव : महापालिकेच्या कर्मचार्‍यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात यावा, या मागणीसाठी सफाई मजदूर संघ, सफाई मजदूर काँग्रेस व शहिद भगतसिंग सफाई कामगार संगघटना व जळगाव जागृती मंच यांच्या पदाधिकार्‍यांनी दि. 23 नोव्हेंबरपासून बेमुदत कामबंद आंदोलन पुकारले आहे.

महानगरपालिकेच्या कर्मचार्‍यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात यावा, या मागणीसाठी सफाई मंजदूर काँग्रेसचे जितेंद्र चांगरे, मनपा सफाई मजदूर संघाचे अजय घेंगट, शहिद भगतसिंग मनपा सफाई कामगार संघटनेचे अनिल नाटेकर व जळगाव जागृती मंचचे शिवराम पाटील, ईश्वर मोरे यांनी महापालिकेचे आयुक्त सतिष कुलकर्णी यांची भेट घेतली. याप्रसंगी कर्मचार्‍यांना वेतन आयोग लागू करण्याची मागणी सदर पदाधिकार्‍यांनी केली असता मनपा आयुक्त सतिष कुलकर्णी यांनी मनपाची वसुली 80 ते 90 टक्के झाल्याशिवाय वेतन आयोग लागू करता येणार नाही, शासनाने दिलेल्या आदेशात वसुलीची अट टाकल्यामुळे वेतन आयोग लागू करता येणे शक्य नसल्याचे सांगितले.

त्यावर सदर संघटनांच्या पदाधिकार्‍यांनी इतर महापालिकांनी ज्या प्रमाणे वेतन आयोग लागू केले त्या प्रमाणे जळगाव मनपाच्या कर्मचार्‍यांना वेतन आयोग लागू करावे असे सांगितल्यावर आयुक्तांनी नकारात्म भूमिका घेतल्यामुळे सदर संघटनांनी दि.23 नोव्हेंबर पासून बेमुदत संप पुकारला असल्याची माहिती अजय घेंगट व कॉ. अनिल नाटेकर यांनी दिली.