मनपा उर्दु शाळा क्र. 11मध्ये वार्षिक क्रिडा महोत्सव

0

जळगाव : शालेय व दैनंदिन जिवनात क्रिडा व शालेय शिक्षणाचे महत्त्व याबाबत फारूच शेख यांनी मार्गदर्शन केले. तसेच शेख यांनी करत स्पर्धेतील प्रथम तीन खेळाडूंना जैन स्पोर्टस् अकॅडमीतर्फे सुवर्ण, रजत व कास्य पदक तर सांघिक खेळांमध्ये विजेता संघांना चषक देण्याची घोषणा केली. ते महानगर पालिका उर्दू शाळा क्र. 11 सुप्रिम कॉलनीमध्ये वार्षिक क्रिडा महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. अध्यक्षस्थानी जावेद इकबाल हे तर उद्घाटक म्हणून जैन स्पोर्टस् अकॅडमीचे फारूख शेख होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक अ. रहेमान जनाब, मिर्झा इकबाल, जमशेर पठाण, हाजी मजहर जनाब तसेच अरमान शाह, अकबर पटेल आदी उपस्थित होते.

आठ गटात आयोजन
या मोहत्सवात विद्यार्थी व विद्यार्थींनीचे प्रत्येकी चार याप्रमाणे आठ गट तयार करण्यात आले आहेत. स्पर्धेंत 1ली ते 8वीच्या विद्यार्थी व विद्यार्थींनींसाठी संगीत खुर्ची, बास्केटबॉल, थ्रो बॉल हे वैयक्तिक खेळ घेण्यात आले. तर सांघिक खेळात लंगडी, कब्बडी, खो-खो असे खेळ घेण्यात आले. तर 1ली ते 8 वीच्या विद्यार्थींनींसाठी संगीत खुर्ची, लिंबु चमचा, थ्रो बॉल, धावणे, स्टूडींग जंप असे खेळ घेण्यात आले. सूत्रसंचालन अकिल शेख यांनी तर आभार नजिम शाह यांनी मानले. यशस्वीतेसाठी मुख्यध्यापक अ. मतीन खान व शाळेतील शिक्षकांनी कामकाज पाहिले.