मनपातील ११ समित्या गठीत करण्यासाठी गटनेत्यांची बैठक

0

जळगाव, – शहर मनपात गठीत करण्यात येणार्‍या विविध ११ समित्यांच्या सदस्य निवडीसंदर्भात माहिती देण्यासाठी गुरुवारी महापौर भारती सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली.

महापौर भारती सोनवणे, स्थायी समिती सभापती राजेंद्र पाटील, भाजप गटनेते भगत बालाणी, शिवसेनेचे विरोधी पक्षनेते सुनील महाजन, गटनेते अनंत जोशी, एमआयएमचे गटनेते रियाज बागवान, नगरसेवक कैलास सोनवणे, विशाल त्रिपाठी, नगरसचिव सुनील गोराणे आदी उपस्थित होते.प्रत्येक समितीमध्ये ७ सदस्य असून त्यात पक्षीय संख्याबळानुसार भाजपच्या ५ तर सेनेच्या २ सदस्यांचा समावेश करता येणार आहे. सदस्य संख्येनुसार एमआयएमचे सदस्य कमी असल्याने त्यांच्या सदस्याचा समितीमध्ये समावेश करता येऊ शकणार नाही मनपात असलेल्या बांधकाम समिती, अतिक्रमण समिती, स्वच्छता समिती, पाणी पुरवठा समिती, दवाखाना समिती, नियोजन समिती, आस्थापना समिती, विधी समिती, वाहन व्यवस्था समिती, शिक्षण समिती, विद्युत समितीमध्ये सदस्य निवडीसाठी गटनेत्यांनी आपापल्या पक्षाच्या सदस्यांची नावे बंद पाकिटात महासभेत महापौरांकडे द्यायची असून त्यानंतर महासभेत समित्यांना मान्यता दिली जाणार आहे.

Copy