मध्य रेल्वेच्या ब्लॉकमुळे 21 गाड्या खोळंबल्या : प्रवाशांचे हाल

भुसावळ : रेल्वे ब्रीज वर गर्डर टाकण्यासाठी चार तासांचा तसेच बर्‍हाणपूर स्टेशन येथे इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग पॅनल कामासाठी दुसखेडा-सावदा दरम्यान बुधवारी साडेपाच तासांचा रेल्वे प्रशासनातर्फे मेगाब्लॉक घेण्यात आल्याने अप-डाऊन मार्गावरील तब्बल 21 गाड्या खोळंबल्याने प्रवाशांचे चांगलेच हाल झाले. भादली-जळगाव दरम्यान, 10.40.ते 2.40 तर र दुसखेडा-सावदा दरम्यान सकाळी 9.40 ते 3.50 या वेळेत ब्लॉक घेण्यात आला.

अप-डाऊन मार्गावर गाड्या खोळंबल्या
ब्लॉकमुळे अहमदाबाद हावडा एक्सप्रेस, लोकमान्य टिळक टर्मिनस-गोरखपूर एक्सप्रेस, मुंबई-हावडा गीतांजली एक्स्प्रेस, गोवा एक्सप्रेस, अजमेर-पुरी, गुवाहाटी, पुष्पक एक्स्प्रेस अनुक्रमे जळगाव, म्हसावद, माहिजी, धरणगाव, गाळण, कजगाव आदी स्थानकांवर थांबवण्यात आल्या. अप मार्गावर नवी दिल्ली-बंग्लोर कर्नाटक एक्स्प्रेस, गोरखपूर-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस, अजमेर-हैदराबाद, पुष्पक एक्सप्रेस, हरीद्वार-लोकमान्य टिळक टर्मिनस, लखनऊ-लोकमान्य टिळक टर्मिनस, कामायनी एक्सप्रेस, श्री गंगानगर-नांदेड, सिकंदराबाद-हिसार एक्स्प्रेस, गीतांजली, नागपूर-अहमदाबाद प्रेरणा एक्सप्रेस अनुक्रमे सावदा, निंभोरा, रावेर, वाघोडा, भुसावळ आदी स्थानकावर थांबवून ठेवण्यात आल्या. दरम्यान, गाड्या विलंबाने धावल्याने प्रवाशांचे चांगलेच हाल झाले.