Private Advt

मध्य रेल्वेच्या पाच विभागातील 25 आरपीएफ निरीक्षकांच्या बदल्या

भुसावळ : मध्य रेल्वेतील नागपूर, भुसावळ, मुंबई, पुणे, सोलापूर या पाचही विभागातील 25 आरपीएफ निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश गुरूवारी निघाले. जळगाव येथे मुंबई येथून निरीक्षक ज्ञानेश्वर पाटील यांची तर नाशिकरोड येथे हरफुलसिंग यादव यांची नियुक्ती झाली. नाशिक येथील नरेशसिंग गहलोट यांची मुंबई येथे, मनमाड वर्कशॉप येथील अनिल कुमार चव्हाण यांची मुख्यालय, बडनेरा येथील बच्चूसिंग नरवर यांची मुंबई, भुसावळ येथील दिनेश मिश्रा यांची पुणे, लक्ष्मण आर. यादव कोपरगाव येथून बडनेरा वर्कशॉप यांच्या बदल्या झाल्या आहेत.