मध्य प्रदेश विधानसभेत जोरदार गदारोळ

0

भोपाळ: कॉंग्रेसचे दिग्गज नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांनी कॉंग्रेसला रामराम ठोकत भाजपात प्रवेश केल्याने मध्य प्रदेशमधील कमलनाथ सरकार मोठ्या संकटात सापडले आहे. आजच सोमवारी कमलनाथ सरकारला बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. अधिवेशनाला सुरवात झाली असून राज्यपाल यांचे अभिभाषण झाले आहे. राज्यपाल लालजी टंडन यांनी सर्व आमदारांना शांतता राखण्याचे आवाहन करत लोकशाहीला धोका निर्माण होईल असे कृत न करण्याची विनंती केली.

विधानसभेत मोठा गदारोळ झाल्याचे दिसून आले. राज्यपालांचे अभिभाषण संपले असून बहुमत चाचणी बाबत अद्याप उत्सुकता कायम आहे.