मध्य प्रदेश निवडणूक: दीड वाजेपर्यंत ३३ टक्के मतदान !

0

भोपाळ –मध्य प्रदेश विधानसभेच्या २३० जागेसाठी आज मतदान होत आहे. एकूण २९०७ उमेदवार रिंगणात आहे. दरम्यान दुपारी १.३० वाजेपर्यंत ३३ टक्के मतदान झाले आहे. काही ठिकाणी मतदान यंत्रात बिघाड झाल्याचे प्रकार समोर आले आहे. मतदार यंत्रात बिघाड झाल्याने काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

राज्यातील ५,०४,९५,२५१ मतदार मतदानाचे हक्क बजावणार आहे.