मध्य प्रदेश निवडणूक: ड्यूटी असणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांचा मृत्यू

0

रायपुर- आज मध्य प्रदेश विधानसभेसाठी मतदान होत आहे. सकाळी ८ वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली आहे. दरम्यान राज्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणाहून ड्यूटी असलेल्या दोन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. गुना येथे निवडणुकीसाठी ड्यूटीवर असलेले पीठासीन अधिकारी कैलास पटेल यांच्या छातीत अचानक वेदना होऊ लागल्या. त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

दुसऱ्या घटनेत बमोरी येथे घडली. येथे निवडणूक ड्यूटीवर असलेले सोहन लाल बाथम यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट झालेले नाही. दरम्यान जिल्हाधिकारी यांनी मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना १० लाखाची मदत जाहीर केली आहे.

Copy