मध्य प्रदेश सरकारचे भूमीपुत्रांना मोठे गिफ्ट; स्थानिक तरुणांनाच नोकऱ्या

0

भोपाळ: मध्य प्रदेश सरकार भूमिपुत्रांसाठी मोठ्या निर्णयाच्या तयारीत आहे. मध्य प्रदेशातील तरुणांनाच फक्त राज्यात नोकरीची संधी दिली जाणार आहे. मध्य प्रदेशातील शासकीय नोकऱ्या फक्त स्थानिक तरुणांनाच देण्यात येईल, यासाठी आम्ही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत आहोत असे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सांगितले.

भूमिपुत्रांना न्याय देण्यासाठी मध्य प्रदेश सरकार हा निर्णय घेतला आहे.  हा निर्णय झाल्यास मध्य प्रदेशातीलच तरुणांना राज्यात नोकरी करता येईल, इतर राज्यातील तरुण मध्य प्रदेशात नोकरीसाठी अर्ज करू शकत नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात भूमिपुत्रांना नोकऱ्या उपलब्ध होतील.

Copy