मध्य प्रदेशातील इसमाचा ग्रामीण रुग्णालयात मृत्यू

0

रावेर । तालुक्यातील कर्जोद येथे मध्य प्रदेशातून आलेल्या पाहुण्यास रक्ताच्या उलट्या होऊन मृत्यू झाल्याची घटना बुधवार 22 रोजी घडली. याबाबत अकस्मात मृत्युची नोंद रावेर पोलिसात करण्यात आली आहे.

मध्य प्रदेशातील बोरी येथील नाण्या बोरेलाल बारेला (वय -28) हा कर्जोद येथे त्यांच्या नातेवाईकांड़े आला होता त्याला उलट्यांचा त्रास जाणवू लागल्याने तो उपचारासाठी रावेर ग्रामीण रुग्णालयात दाखल झाला. उपचार सुरु असतांना दुपारी 3. 45 वाजेच्या सुमारास त्याचे निधन झाले. याबाबत ग्रामीण रुग्णालयाचे डॉ.बी.बी. बारेला यांनी खबर दिल्याने रावेर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. सहाय्यक फौजदार नेताजी वंजारी पुढिल तपास करीत आहे