मध्य प्रदेशचे राज्यपाल लालजी टंडन यांचे निधन

0

भोपाळ: मध्य प्रदेशचे विद्यमान राज्यपाल लालजी टंडन यांचे आज सकाळी निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते. आज सकाळी ५.३० च्या सुमारास लालजी टंडन यांनी अखेरचा श्वास घेतला. लालजी टंडन यांच्यावर लखनऊच्या गुलाला घाट येथे आज सायंकाळी ४.३० वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांच्या निधनाने पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अमित शहा, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चव्हाण यांनी शोक व्यक्त करत आदरांजली वाहिली आहे.

लालजी टंडन यांना ११ जुलैला श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने लखनऊच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ते व्हेंटिलेटरवर होते. अवयव निकामी झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. त्यांची फुप्फुस, किडनी आणि लिव्हर व्यवस्थित काम करत नव्हते. रुग्णालयात दाखल करताना त्यांची कोविड चाचणी करण्यात आली होती. त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आला होता अशी माहिती रुग्णालयाकडून देण्यात आली होती.

Copy