मध्यप्रदेश ईव्हीएम मशीन वाद; नायब तहसिलदार निलंबित !

0

भोपाळ-मध्य प्रदेश विधानसभेसाठी मतदान झाले आहे. मात्र मतदानानंतर ईव्हीएममशीन स्ट्रॉममध्ये पोहोचण्यास झालेल्या विलंबामुळे आणि स्ट्रॉममधील सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याने मोठे वाद निर्माण झाले आहे. या प्रकारावरून कॉंग्रेसने भाजपवर निशाना साधत आरोप केले आहे. कॉंग्रेसने निवडणूक आयोगाकडे याबाबत तक्रार देखील केली आहे. दरम्यान सागर येथील नायब तहसिलदारला निलंबित करण्यात आले आहे.

मतदानानंतर ४८ तासांनी ३७ राखीव ईव्हीएम मशीन सागर येथील स्ट्रॉममध्ये पोहोचविण्यात आले. त्यानंतर तब्बल २ तास सीसीटीव्ही कॅमेरे बंद होते. दरम्यान निवडणूक आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले असून मतदारांना मतदान यंत्राशी कोणत्याही प्रकारे छेडछाड करण्यात आलेली नाही असे आश्वासन ट्वीटरद्वारे दिले आहे.