मधुकर सहकारी साखर कारखान्यात कृषी सहाय्यकांचा सत्कार

0

फैजपूर । मधुकर सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर शेती विभागातील लागवड हंगाम 2016-17 मध्ये पूर्व हंगामी लागवड उद्दिष्ट पूर्ण करणार्‍या शेती विभागातील कर्मचार्‍यांना चेअरमन शरद महाजन, ऊस लागवड व विकास उपसमिती चेअरमन मिलींद नेहेते यांच्या हस्ते रोख बक्षीस व प्रशस्ती पत्र देवून गौरव करण्यात आला. यामध्ये 11 शेती विभागाच्या कर्मचार्‍यांनी उद्दिष्ट पूर्ण केलेले आहे. या प्रोत्साहन बक्षिस समारंभामध्ये शेती विभागातील कर्मचार्‍यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे कारखाना कार्यक्षेत्रात ऊस लागवड वाढविण्यास मदत होईल.

याप्रसंगी कारखान्याचे चेअरमन शरद महाजन, संचालक मिलींद नेहेते, नरेंद्र नारखेडे, डी.एच. बोरोले, नितीन चौधरी, सुरेश पाटील, भागवत पाचपोळे, गिरीश कोळंबे, कार्यकारी संचालक महेश सगरे, सचिव तळेले, शेती अधिकारी के.डी. भंगाळे, राजेंद्र महाजन, प्रमोद झोपे, व्ही.पी. शिंदे, ऊस विकास निरीक्षक गिरीश चौधरी यांसह शेती विभागातील कर्मचारी हजर होते.

किड निवारणासाठी संशोधन
तसेच व्ही.एस.आय पुणेचे शास्त्रज्ञ यांची कारखाना कार्यक्षेत्रात 4 ते 5 वर्षांपासून संशोधन सुरु आहे. ऊस पिकावर विविध रोग व किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर आल्यामुळे एकरी ऊस उत्पादनात घट येत आहे. यासाठी व्ही.एस.आय. यांनी संशोधित केलेले जैविक किड नाशकाचे प्रात्याक्षिक शास्त्रज्ञ आर.जी. यादव, बी.जी. माळी यांनी सावखेडा येथील शेतकरी अनिल बडगुजर यांच्या शेतावर प्रात्याक्षिक केले आहे. ऊस उत्पादक शेतकर्‍यांमध्ये किड व रोग नियंत्रणाची जागृती होण्यासाठी कारखाना ऊस शेती विभाग प्रयत्न करीत आहे. या प्रात्याक्षिकप्रसंगी ऊस लागवड उपसमितीचे अध्यक्ष मिलींद नेहेते, व्ही.एस.आय.चे शास्त्रज्ञ यादव, माळी व कारखाना ऊस विकास अधिकारी व्ही.पी. शिंदे, शेती विभागातील दहिगाव, सावखेडा, मोहराळा, वड्री, कोरपावली गटाचेे कर्मचारी व ऊस उत्पादक शेतकरी हजर होते.