मधुकर कारखान्यात रंगला सत्कार सोहळा

0

फैजपूर। महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळतर्फे जागतीक कामगार दिन व महाराष्ट्र दिनाला मधुकर सहकारी साखर कारखाना येथील कारखाना येथील कारखान्याचे सामान्य प्रशासन विभागातील कर्मचारी विकास भोजराज चोपडे यांना कर्तृत्ववान कामगार म्हणुन महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ दिपनगरचे अधिकारी शेख यांच्या हस्ते सन्मान चिन्ह, सन्मानपत्र देवून सन्मानित करण्यात आले. तसेच कारखान्याचे कर्मचारी व मसाका राष्ट्रीय कामगार संघाचे सचिव एकनाथ धोंडु लोखंडे यांना कर्तृत्ववान कामगार म्हणून कारखान्याचे प्रभारी सचिव तेजेंद्र तळेले यांच्या हस्ते सन्मानचिन्ह, सन्मानपत्र देवून सन्मानित करण्यात आले.

एमएसईडी संतोष गंभीर सुुर्यवंशी, रावेर एसटी डेपोचे शेख साबीर शेख करीम, भुसावळ रेल्वे इंजिन कारखान्याचे संजय आनंदा सुरवाडे, सुप्रीम इंडस्ट्रिजचे कैलास रमेश भोळे यांना सन्मानित करण्यात आले. प्रसंगी कामगार कल्याण मंडळचे अधिकारी तसेच कारखान्याचे अधिकारी सुधाकर चौधरी, पुंडलीक माळी, किरण चौधरी, तुषार राणे, विनोद फेगडे, संदीप पाटील, पराग चौधरी, रविंद्र चव्हाण उपस्थित होते.