मद्य-मांस विक्री करणार्‍यांवर गुन्हे दाखल करा

0

जळगाव । महाराष्ट्रात अनेक मद्य आणि मांस विक्री करणार्‍या दुकानांना देवता, संत आणि राष्ट्रपुरुष यांची नावे दिलेली आढळतात. देवता, संत आणि राष्ट्रपुरुष हे पूजनीय असून मद्य आणि मांस विक्री करणार्‍या तमोगुणी आस्थापनांना देवता, संत आणि राष्ट्रपुरुष यांची नावे देणे, हा त्यांचा अवमान आहे. हे हिंदु धर्मीयांच्या भावना दुखावणारे आहे. तरी या प्रकरणी शासनाने तत्परतेने दखल घेऊन अशा मद्य-मांस विक्रेत्यांवर गुन्हा दाखल करावा आणि त्यांना संबंधित दुकानांची नावे पालटण्यास भाग पाडावे, अशा मागणीसाठी महानगरपालिकासमोर राष्ट्रीय हिंदू आंदोलन संघटनेतर्फे आंदोलन करण्यात आले.

भरपाई खासदारांच्या वेतनातून वसूल करा
आंदोलनामध्ये अन्य मागण्याही करण्यात आल्या. सध्या लोकप्रतिनिधींकडून संसदेत जनहिताचे प्रश्‍न मांडण्यापेक्षा संसदेचे कामकाज अधिकाधिक वेळ बंद कसे पडेल, यातच अधिक रस असल्याचे दिसून येते. नुकतेच पार पडलेले संसदेचे हिवाळी अधिवेशन नोटाबंदीच्या सुत्रावरून वारंवार बंद पाडण्यात आले. यामुळे देशहिताचे अनेक प्रश्‍न, अनेक विधेयके प्रलंबित राहिली, पर्यायाने राष्ट्राचीही हानी झाली. वर्ष 2016 च्या हिवाळी अधिवेशनात गोंधळ घालणार्‍या खासदारांनी वाया घालवले. परिणामी जनतेकडून कररूपाने गोळा केलेले 198 कोटी रुपये वाया गेले. संसदेत लोकप्रतिनिधीच जनतेच्या पैशांची नासाडी करत आहे. जनतेच्या पैशाची नासाडी होऊ नये, म्हणून सभागृहाचे कामकाज बंद पडल्याने होणारी आर्थिक हानी गोंधळ घालणार्‍या खासदारांच्या वेतनातून वसूल करावी, अशी मागणी यावेळी केली