मद्यपी पतीने जलचक्रच्या विवाहितेला पेटवले

0

बोदवड- तालुक्यातील जलचक्र येथील 33 वर्षीय विवाहितेस मद्यपी पतीनेच पेटवून दिल्याची घटना 20 रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी जयनाली मो.मुलतानी (33, रा.जलचक्र) या विवाहितेने दिलेल्या फिर्यादीनुसार संशयीत आरेापी व पती मो.नबी मुलतानी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. 20 रोजी चार सुमारास जयनाली या बाजारातून घरी आल्यानंतर आरोपी पतीने मद्य प्राशन करून आताच्या आत्ता जेवायला दे म्हणत वाद घातला. स्वयंपाक बनवून देते, असे सांगितल्याचा राग आल्याने आरोपीने पतीने मारहाण करीत घरातील रॉकेल अंगावर टाकून पेटवून दिल्याचा आरोप विवाहितेने केला आहे. जखमी विवाहितेवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू असून तिने दिलेल्या जवाबावरून आरोपी पतीविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास उपनिरीक्षक दिलीप चौधरी करीत आहेत.

Copy