मद्यपी कारचालकाची दुचाकीला धडक

0

जळगाव। सुभाष चौक परिसरातील सराफ बाजारात कार चालकाने मद्य पिऊन गाडी चालवून टेलीफोन खांब व दुचाकीला धडक देवून नुकसान केल्याचा प्रकार गुरूवारी मध्यरात्री 1.30 वाजेच्या सुमारास त्याबाबत शनीपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

भिलपुरा चौक भागात राहणारा जहिर नुरी याने दारुच्या नशेत गुरूवारी 6 एप्रिलच्या मध्यरात्री 1.30 च्या सुमारास इंडीका व्हीस्टा (क्रं.एमएच.19.एपी.3889) ही कार सुभाष चौक परिसरातील सराफ बाजारातुन बेदारकपणे चालवत सोनी कॉम्पलेक्स समोरील दागीना कॉर्नर जवळील टेलीफोन खांब्याला धडक दिली. यानंतर विश्‍वनाथ अग्रवाल यांच्या घरासमोर लावलेली त्यांच्या मालकिची दुचाकी (क्र. एमएच.19.बीवाय.1700) ला जोरदार धडक देऊन नुकसान केले. याबाबत विश्‍वानाथ अग्रवाल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जहिर नुरी याच्याविरूध्द शनिपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.