मदतीचे हात पुढे आल्याने गोर-गरीबांना मदत करणे शक्य

0

रावेर : जगभर झालेल्या कोरोना व्हायरसच्या प्रभावाने गोरगरीब व मजुरांच्या जीवनावर मोठा प्रभाव झाला असून अनेक कुटुंबांना कुठलीही सुविधा किंवा योजनांचा लाभ भेटत नाही. अशा कुटुंबासाठी फैजपूरचे प्रांताधिकारी डॉ.अजीत थोरबोले यांनी केलेल्या आवाहनाला गोरगरीबांच्या मदतीसाठी रावेर तालुका ऍग्रो डिलर्स असोसीएशनच्या वतीने लुमखेडा व मस्कावद, ता.रावेर येथे अत्यंत गरजू व गरीब कुटुंबांना अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तू 80 ते 90 कुटुंबांना उपलब्ध करून दिल्या.

यांची होती उपस्थिती
यावेळी फैजपूर प्रांताधिकारी डॉ.अजित थोरबोले, रावेरच्या तहसीलदार उषाराणी देवगुणे यांच्यासह पंचायत समिती कृषी अधिकारी एल.ए.पाटील, लुमखेडा तलाठी आय.आर.कोळी, सरपंच आशाबाई भील, पोलिस पाटील चंपालाल पाटील, रावेर तालुका ऍग्रो डिलर्स असोसिएशनचे अध्यक्ष सुनील कोंडे, संघटनेचे रावेर शहराध्यक्ष एकनाथ महाजन, संघटनेचे सचिव युवराज महाजन, मस्कावदचे जिल्हा परीषद सदस्य कैलास सरोदे, तलाठी श्रीहरी कांबळे, मस्कावद ग्रामपंचायतीचे पदाधिकारी यांच्यासह संघटनेचे सदस्य श्रीपाद जंगले, रवींद्र बारी, अनिल चौधरी, राजू महाजन, नितीन पाटील, राहुल शिंदे, दिनकर पाटील, महेंद्र चौधरी, भागवत पाटील, प्रकाशशेठ चौधरी, राजीव भोगे, निंभोरा स्टेशन सोसायटीचे प्रकाश चौधरी आदी पदाधिकारी व कृषी विक्रेते कार्यक्रमास उपस्थित होते.

विनाकारण बाहेर न पडण्याचे आवाहन
प्रांताधिकारी डॉ.थोरबोले यांनी कोरोनाबाबत जनजागृती करीत कार्यक्रमादरम्यान ही योग्य अंतर कायम ठेवण्याचे आवाहन करीत विनाकारण बाहेर फिरण्याचे टाळून प्रत्येक रुग्णामागे शासनाचा 10 हजारांपर्यंत खर्च होत असून पूर्ण कुटुंब ही धोक्यात येते त्यामुळे आपण सर्वांनी जागरूक नागरीक म्हणून भूमिका पार पाडण्याचे आवाहन करीत रावेर ऍग्रो डिलर्स असोसिएशनचे गोरगरीबांसाठी मोफत अन्नधान्य वितरणासाठी तहसीलदार उषाराणी देवगुणे यांनी आभार मानले.

सर्व पत्रकारांना मास्क देणार : सुनील कोंडे
प्रांताधिकारी डॉ.अजित थोरबोले व तहसीलदार उषाराणी देवगुणे यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून जिल्हाध्यक्ष विनोद तराळ यांच्या मार्गदर्शनाने रावेर ऍग्रो डिलर्स असोसिएशनने हा उपक्रम राबविला. यानंतर रावेर तालुक्यातील इतक्या गंभीर परीस्थीतीत ही काम करणार्‍या सर्व पत्रकार बांधवांना मास्क उपलब्ध करून देणार आहोत, असे रावेर तालुका ऍग्रो डिलर्स असोसिएशनचे अध्यक्ष सुनील कोंडे म्हणाले.

Copy