मतांच्या राजकारणामुळे देशाचे ७० वर्षात नुकसान

0

भोपाळ- भाजपाने मध्य प्रदेशमधून निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात केली आहे. भाजपच्या महाकुंभ मेळाव्याच्या माध्यमातून नरेंद्र मोदी आणि अमित शाहांनी कार्यकर्त्यांत उत्साह भरण्याचा प्रयत्न केला आहे. यावेळी मोदींनी मतांच्या राजकारणामुळे देशाचं 70 वर्षांत नुकसान झाल्याचे सांगत काँग्रेसवर आरोप केले.

भाजपाचा सर्वात मोठा मेळावा असल्याचा दावा मोदींनी केला आहे. यावेळी मोदींनी अमित शाहांच्या कामाचं कौतुकही केलं. मोदी म्हणाले, भाजपा सर्वात मोठा पक्ष असल्याचा गर्व आहे. स्वातंत्र्यानंतरही देश तीन महापुरुषांना कधीही विसरणार नाही, महात्मा गांधी, राममनोहर लोहिया आणि दीनदयाल उपाध्याय यांना कधीही विसरणार नाही. पंडित दीनदयाल उपाध्याय यांचं जीवन हे एक प्रेरणा आहे. आम्ही सामाजिक न्यायावर विश्वास ठेवतो.