मतदार यादीवरून दिल्ली विधानसभेत गदारोळ

0

नवी दिल्ली- दिल्लीत मतदार यादीवरून चांगलेच वातावरण तापले आहे. याच मुद्द्यावरून आज विधानसभेत मोठा गदारोळ पाहायला मिळाले. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपला फायदा व्हावा यासाठी मतदार यादीतून १० लाख नावे वगळण्यात आली आहे असे आरोप आम आदमी पक्षाने केले आहे. याच मुद्द्यावरून दिल्ली विधानसभेत विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात गदारोळ झाल्याचे पाहायला मिळाले.

ज्या मतदारांचे नावे मतदार यादीतून वगळण्यात आले आहे, त्यांची नावे पुन्हा मतदार यादीत समाविष्ट करण्यात यावे अशी मागणी आम आदमी पक्षाकडून वारंवार होत आहे. मात्र हेतूपुरस्कर नावे समाविष्ट केली जात नाही असे आरोप आपने केले आहे. दरम्यान आपचे हे आरोप निरर्थक असल्याचे भाजपने सांगितले आहे.

या संपूर्ण प्रकरणाची तीन महिन्यात चौकशी करण्याबाबत ठराव करण्याला मंजुरी देण्यात आली आहे. निवडणूक आयोगासोबत राजकीय पक्षाने घरोघरी जाऊन मतदार यादीतील नावे तपासण्याबाबत विचार करण्यात आले आहे.

Copy