‘मणिकर्णिका’ पुन्हा एकदा वादात

0

मुंबई : बॉलिवूडची क्वीन कंगना रनौतचा आगामी ‘मणिकर्णिका- द क्वीन ऑफ झाँसी’ हा चित्रपट पुन्हा एकदा वादात अडकला आहे. आता चित्रपटाच्या क्रु मेंबर्सने चित्रपट निर्मात्यांवर पैसे थकविल्याचा आरोप केला आहे. ‘मणिकर्णिका’च्या निर्मात्यांनी जवळपास १.५ कोटी रुपये थकविल्याचा आरोप या क्रू मेंबर्सनी केला आहे.

गेल्या ३ महिन्यांपासून चित्रपटासाठी काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचे अजूनही पैसे दिले नसून ज्यूनिअर कलाकारांचेही २५ लाख रूपये देणे बाकी असल्याचे, वेस्टर्न इंडियाच्या सिने कर्माचाऱ्यांच्या संघाने म्हटलं आहे.