‘मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झांसी’चा टीझर प्रदर्शित

0

मुंबई : बॉलीवूडची क्वीन कंगना रनौत आता राणी लक्ष्मीबाई बनून येत आहे. बहुचर्चित ‘मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झांसी’ चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. आज गांधी जयंतीच्या दिवशी हा टीझर प्रदर्शित केला गेला आहे.

कंगना या चित्रपटात झांसीच्या राणीची भूमिका साकारत आहे. चित्रपटाच्या टीझरची सुरुवात महानायक अमिताभ बच्चन यांच्या आवाजापासून होते. यामध्ये कंगनाचा लुक अतिशय जबरदस्त दिसत आहे.

या भूमिकेसाठी कंगनाने खास तलवारबाजीचे धडेही गिरवले आहेत. हा चित्रपट २५ जानेवारी २०१९ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Copy