मजूर घेऊन जाणारे वाहन खोलदरीत कोसळले; ६ जण ठार

0

नंदूरबार: जिल्ह्यातील धडगाव तालुक्यात अतिदुर्गम भागात मंजुरांना घेऊन जाणारे चारचाकी वाहन खोल दरीत कोसळल्याची घटना घडली आहे. या अपघातात 6 मजुरांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मृतांची संख्या वाढण्याची भीती वर्तवली जात आहे. अपघात इतका भीषण होता की वाहनाचा अक्षरश: सांगाडा उरला आहे.

तोरणमाळ खडकी रस्त्यावर ही घटना घडली आहे. गावातील काही मजुरांना नियमितपणे कामावर जात होते. आज शनिवारी सकाळी तोरणमाळ खडकी रस्त्यावर अचानक या वाहनाचा अपघात झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि आरोग्य कर्मचाऱ्यांसह स्थानिक गावकऱ्यांनी धाव घेतली.

Copy