मजीप्रच्या कर्मचार्‍यांना वेतन, निवृत्तीवेतन देण्याची मागणी

0

जळगाव । महाराष्ट्र जीवन प्रधिकरणाच्या कर्मचार्‍यांचे वेतन व निवृत्ती वेतन देण्याचे दायित्व महाराष्ट्र शासनाने स्विकारे अशी मागणी महाराष्ट्र्र जीवन प्राधिकरण संयुक्त संघटनेतर्फे करण्यात आली आहे. यासंदर्भांत जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. जालिंदर सुपेकर यांना निवेदन मंगळवार 21 फेब्रुवारी रोजी देण्यात आले. शासनाने दायित्व न स्किरणल्यास राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा निवेदनता देण्यात आला आहे.

घटनादुरुस्ती नंतर संस्थेचे हस्तांतरण
राज्यातील नागरी व ग्रामीण भागातील पाणी पुरवठा आणि मलनिःसारण कार्यक्रम जलदगती विकास व नियमन करण्याच्या अनुषंगाने महाराष्ट्र पाणी पुरवठा व जलनिःसारण मंडळ म्हणजेच आताचे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण स्थापति करण्यात आले. या प्राधिकरणाचा खर्च महाराष्ट्र्र जीवन प्राधिकरणास मिळणार्‍या 17.5 टक्के ई.टी.पी. मधून भागविण्यात येत होता. घटना दुरूस्तीनुसार पाणी पुरवठा व्यवस्थान, नियोजन व कार्यान्वन स्थानिक संस्थेकडे हस्तांतरीत करणेत आल्याने महाराष्ट्र जीवन प्राधिकारणाच्या उत्पन्नाचे स्त्रोत अतिशय कमी झाले आहेत.

25 फेब्रुवारी पर्यंत मुदत
महाराष्ट्र जीवन प्राधिकारणातील कर्मचार्‍यांचे वेतन व निवृत्ती वेतन याचे दायित्व स्विकारणाबाबत ठोस निर्णय 25 फेब्रुवारीपर्यंत न घेतल्यास सर्व कर्मचारी 1 मार्च ते 4 मार्च 2017 पर्यंत काळ्या फिती लावून कामे करणार आहेत. यानंतर 5 मार्च पासून मागण्यामान्य होईपर्यंत बेमुदत राज्यव्यापी संपावर जाणार आहेत. तसेच मुंबई येथील आझाद मैंदान तसेच प्रत्येक जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करणार आहेत.