मंदिरे उघडा; मनसेचे आंदोलन

0

शिर्डी: कोरोनामुळे राज्यातील मंदिरे, धार्मिक स्थळे बंद आहेत. त्याचा परिणाम रोजगारावर होत आहे. मंदिर, धार्मिक स्थळ हे रोजगाराचे मोठे साधन असल्याने अनेकांचा रोजगार बुडाला आहे. दरम्यान आता मंदिरे उघडी करावीत अशी मागणी जोर धरू लागली आहे. आज रविवारी १३ रोजी मनसेकडून शिर्डीत आंदोलन करण्यात येत आहे. मनसे नेते बाळा नांदगावकर यांच्या नेतृत्त्वाखाली हे आंदोलन सुरु आहे.

अनेकांची उपजीविका मंदिरावर अवलंबून असल्याने याचा तातडीने विचार व्हावा अशी मागणी मनसेने केली आहे. काही दिवसांपूर्वी भाजपने देखील मंदिर उघडण्याच्या मागणीसाठी राज्यभर आंदोलन केले होते. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी देखील पंढरपुरात आंदोलन केले होते. त्यानंतर आता मनसेकडून आंदोलन सुरु आहे.

Copy