मंदाना बसस्टॅण्ड येथे एकास गावठी पिस्तुलासह अटक

0

शहादा। मंदाना बसस्टँड जवळ देशी बनावटीचे पिस्तुल घेवून फिरणार्‍यास शहादा स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने अटक केली आहे. मध्यप्रदेशातून देशी बनावटीचे पिस्तुल विक्रीसाठी तरूण येणार असल्याचे गुप्त माहितीद्वारे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक गिरीश पाटील यांनी सापळा रचला होता. सकाळी 6 वाजेपासून पोलीसांनी सापळा रचला होता. यावेळी रात्री 9 वाजता मंदाना बसस्टँडजवळ पायी येणार्‍या तरूणाच्या हालचालीवर संशय आल्याने पोलीसांनी त्या तरूणाची विचारपुस केली.

त्याची झडती घेतल्यावर त्याकडे गावठी बनावटीचे पिस्तुल आढळून आले. विजय देवराम ब्राह्मणे (वय 21) रा. शिव टेकडी पानसेमल असे त्या तरूणाचे नाव आहे. याकारवाईत पोलीस अधिक्षक राजेंद्र डहाळे, प्रशांत वाघुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थागुआशा पोहेकॉ रविंद्र लोढे, दिपक गोरे, जितेंद्र अहिरराव , गोपाल चौधरी, किरण पावरा, संदिप लांडगे यांनी कारवाई केली.