मंदाताई खडसे सुट्टीवर, मोरेकाका दुध संघाचे प्रभारी चेअरमन

जळगाव – जिल्हा दुध उत्पादक संघाच्या चेअरमन मंदाताई खडसे ह्या महिनाभरासाठी सुट्टीवर गेल्या असल्याने दुध संघाच्या प्रभारी चेअरमनपदी ज्येष्ठ संचालक माजी खा. अ‍ॅड. वसंतराव मोरे यांची दि. १३ रोजी संचालक मंडळाच्या बैठकीत नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती कार्यकारी संचालक मनोज लिमये यांनी दै. जनशक्तिशी बोलतांना दिली. दरम्यान मंदाताई खडसे यांना सक्तवसुली संचालनालय (ईडी)ने भोसरी जमीन खरेदीप्रकरणी समन्स बजावले आहे. या चौकशीच्या पार्श्वभूमीवर हा बदल करण्यात आल्याची चर्चा आहे. प्रभारी चेअरमन माजी खा. वसंतराव मोरे यांनी जिल्ह्यातील दुध उत्पादकांच्या समस्या सोडवुन त्यांना सक्षम करण्याचा संकल्प असल्याचे सांगितले.