मंत्री संजय राठोड पोहरादेवी गडावर दाखल !

0

पोहरादेवी: बीड जिल्ह्यातील परळी येथील तरुणी पुजा चव्हाणने पुण्यात आत्महत्या केली होती. पुजा चव्हाणच्या आत्महत्येमागे शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांचे नाव जोडले गेले आहे. मंत्री संजय राठोड हेच पुजा चव्हाणच्या आत्महत्येला जबाबदार असून त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी होत आहे. पुजा चव्हाणच्या आत्महत्येनंतर मंत्री राठोड हे वीजनवासात गेले होते. 15 दिवसांपासून ते अलिप्त होते. आज मंगळवारी ते बंजारा समाजाचे श्रध्दास्थान असलेल्या पोहरादेवी गडावर संत सेवालाल महाराज यांच्या समाधी दर्शनासाठी आले आहे. यावेळी बंजारा समाज बांधवांकडून जोरदार शक्तीप्रदर्शन सुरु असून मंत्री संजय राठोड पोहरादेवी गडावर सपत्नीक पोहोचले आहे.

पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावर आणि त्यांच्यावर होत असलेल्या आरोपावर काय भूमिका मांडतात? याकडे संपूर्ण रज्याचे लक्ष लागले आहे.

पोहरादेवी येथे समर्थकांचा जोरदार शक्तीप्रदर्शन सुरु आहे. मंत्री संजय राठोड यांच्यासाठी पोहरादेवी येथे होमहवन सुरु आहे. मात्र पोहरादेवीच्या मंहतांनी मंत्री राठोड हे शक्तीप्रदर्शनासाठी नाही तर केवळ दर्शनासाठी येणार असल्याचे सांगितले आहे.

Copy