मंत्रालयात सरकारी कर्मचाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

0

मुंबई : मंत्रालयातील पुन्हा एकदा आत्महत्येचा प्रयत्न झाल्याने खळबळ उडाली. सरकारी कर्मचारी असणाऱ्या दिलीप सोनावणे यांनी विष प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न का केला हे अद्याप समजू शकलेले नाही.

मंत्रालयात शुक्रवारी दुपारी उद्योग विभागाच्या प्रधान सचिवांच्या दालनात दिलीप सोनवणे यांनी विषप्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला. पोलिसांनी तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्या प्रकृतीबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही. त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न का केला याचा पोलीस तपास  करत आहेत. जानेवारी महिन्यात भूसंपादन केलेल्या जमिनीच्या मोबदल्याच्या प्रश्नावरून मंत्रालय परिसरात शेतकरी धर्मा पाटील यांनी विषप्राशन करुन आत्महत्या केली होती. यानंतर मंत्रालयात आत्महत्येचा प्रयत्न करण्याचे प्रकार वाढले आहेत.

Copy