मंगरूळ खून प्रकरणातील दोघा आरोपींना दोन दिवसांची पोलिस कोठडी

0

प्रेमसंबंध असल्याच्या संशयातून झाला होता खून ; निष्पाप वैष्णवीच्या माहितीनंतर उलगड

पारोळा- तालुक्यातील मंगरूळ येथे तरुणीशी असलेल्या प्रेमसंबंधातून व तिला पळवून नेल्याच्या संशयातून कैलास श्रीकृष्ण पाटील (38) यांचा डोक्याला लाकडी दांडका मारून खून करण्यात आला होता. या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींसह अन्य एका अल्पवयीन आरोपीस ताब्यात घेतले होते. दोघा आरोपींना गुरुवारी पारोळा न्यायालयात हजर केले असता त्यांना दोन दिवसांची म्हणजे 24 पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली तर अन्य अल्पवयीन आरोपीस जळगाव बाल न्यायालयात हजर करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

चिमुकल्या वैष्णवीच्या माहितीनंतर खुनाचा उलगडा
आरोपी भाऊसाहेब उर्फ युवराज माधवराव पाटील, सूर्यभान उर्फ पिंटू माधवराव पाटील व अन्य एक अल्पवयीन आरोपीच्या कुटुंबातील तरुणीशी मयत कैलास पाटील याचे प्रेमसंबंध असल्याचा तसेच तिला पळवून नेल्याच्या संशयातून आरोपींनी बुधवारी सकाळी युवराज पाटील यांच्या डोक्यावर, पाठिवर लाकडी दांड्याने मारहाण करून गंभीर दुखापत केली तसेच अन्य दोघा आरोपींनी लाथाबुक्क्यांनी पोटात, तोंडावर मारहाण केल्याने कैलासचा मृत्यू झाला होता. मयत कैलास यांची मुलगी वैष्णवी हिने वडिलांना होत असलेल्या मारहाणीसंदर्भात पारोळा पोलिसांना माहिती दिल्यानंतर खुनाचा उलगडा झाला होता. दरम्यान, मयत कैलासच्या पहिल्या पत्नीचे निधन झाल्यानंतर त्याने दुसरे लग्न केले होते मात्र दुसरीनेही घटस्फोट घेतल्याने कैलास 12 वर्षीय मुलगी वैष्णवी व आई-वडीलांसह राहत होता.

Copy