Private Advt

भोरस येथून 53 वर्षीय व्यक्ती बेपत्ता

भुसावळ/चाळीसगाव : तालुक्यातील भोरस येथील 53 वर्षीय व्यक्ती बेपत्ता झाल्या प्रकरणी ग्रामीण पोलिसात हरविल्याची नोंद करण्यात आली.

ग्रामीण पोलिसात हरविल्याची नोंद
चाळीसगाव तालुक्यातील भोरस येथील रमेश एकनाथ सोनार (53) हे 25 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास घरात कोणालाही काही एक न सांगता निघून गेले. घरच्यांनी परीसरासह नातेवाईकांकडे आजपावेतो शोधाशोध केली असता ते मिळून आले नसल्याने चाळीसगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात मुलगा ज्ञानेश्वर रमेश सोनार यांच्या खबरीनुसार हरविल्याची नोंद करण्यात आली. तपास पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार महाजन करीत आहेत.