Private Advt

भोरटेकजवळ बसला अपघात : ट्रक चालकाविरोधात गुन्हा

फैजपूर : ट्रक व बसमध्ये अपघात होवून बस चालकासह प्रवासी जखमी झाल्याची घटना यावल तालुक्यातील भोरटेक गावाजवळ घडली होती. या अपघातात बसचे चालकदेखील जखमी झाले होते. या प्रकरणी फैजपूर पोलिस ठाण्यात ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

बस चालक अपघातात जखमी
भुसावळ-फैजपूर रोडवरील भोरटेक (ता.यावल) गावाजवळ बुधवार, 27 एप्रिल रोजी सकाळी 11.30 वाजता ट्रक (यु.पी. 80 सी.टी.7536) चे टायर फुटल्यानंतन ट्रक बस (क्रमांक एम.एच. 40 एन.9063) वर धडकली होती. या अपघातात बस चालक विजय हिरामण चौधरी (43, कासार गल्ली, फैजपूर) हे जखमी झाले होते. अपघात प्रकरणी बस चालक चौधरी यांनी ट्रक चालकाविरोधात फिर्याद दिल्यानंतर फैजपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.