Private Advt

भोरटेकजवळ ट्रक-बसमध्ये अपघात : आठ प्रवासी जखमी

यावल : यावल तालुक्यातील भोरटेकजवळ भरधाव ट्रक व बस समोरा-समोर धडकून झालेल्या अपघात आठ प्रवासी जखमी झाले. हा अपघात बुधवार, 27 रोजी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास घडला. अपघातातील जखमींवर गोदावरी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

सकाळच्या सुमारास अपघात
भोरटेक, ता.यावलजवळ बुधवारी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास रावेर आगाराची बस (क्रमांक एम.एच. 40 एन.9063) ही प्रवासी घेऊन जळगावकडून रावेरला जात असताना फैजपूरकडून भुसावळकडे ट्रक (क्रमांक यु.पी.80 सी.टी.7536) हा जात असताना या दोघांची समोरासमोर धडक झाली. या अपघातात बसमधील आठ प्रवासी जखमी झाले. जखमींना तातडीने घटनास्थळावरून गोदावरी हॉस्पिटलला उपचाराकरीता दाखल करण्यात आले आहे. अपघातात पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम दुपारपर्यंत सुरू होते.