भोजन वाटपाचा पास घेऊन सात कोटींची लूट

0

मुंबई – लॉकडाऊन असल्याने गोरगरीबांना भोजन वाटप करण्यासाठीचा पास घेऊन एका एनजीओच्या प्रमुखाने सात कोटींची लूट केल्याची घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी या आरोपीला अटक केली असून त्याच्याकडून ५ कोटी ३० लाखरुपये जप्त केले आहेत. विपूल आनंद चामरिया असे या संशयित आरोपीचे नाव असून तो एकता फाऊंडेशन नावाची एनजीओ चालवतो.

याप्रकरणी सराफा दुकानदार राजकुमार लुथरा यांनी २२ एप्रिल रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. आपल्या दुकान गॅस कटरने फोडण्यात आले. चोरट्यांनी दुकानाच्या छतावर जाऊन चोरट्यांनी सात कोटींचे दागिने लूटल्याचे लुथरा यांनी तक्रारीत म्हटले आहे. या तक्रारीनंतर पोलिसांनी दुकानाच्या परिसरातील अनेक लोकांची चौकशी केल्यानंतर अखेर चामरियाला अटक केली. त्याने लॉकडाऊनच्या काळात भोजन वाटप करण्यासाठीचा पासही घेतला होता. या ज्वेलरीच्या दुकानाची माहिती घेतल्यानंतर त्याने सहाजणांच्या साथीने दुकानात लूट केली. त्यापैकी चारजण त्याच्याच एनजीओमध्ये काम करतात. छोटेलाल चौहान, सुरक्षा गार्ड मुन्ना खरवार अशी इतर आरोपींची नावे आहेत. तर लक्ष्मण नरसप्पा दांडू, शंकर कुमार यशू, राजेश मरपक्का आणि विकास चनावडी हे चारही आरोपी चामरियाच्या एनजीओमध्ये काम करतात. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

Copy