भुसावळ :10 रोजीचे लोक न्यायालय स्थगित

भुसावळ : कोरोनाबाधीतांच्या संख्येत सातत्याने होणारी वाढ पाहता भुसावळ न्यायालयात शनिवार, 10 रोजी आयोजीत केलेले राष्ट्रीय लोक न्यायालय पुढे ढकलण्यात आले आहे. शनिवारी येथील न्यायालयात लोक न्यायालयाचे आयोजन करण्यात आले असलेतरी मात्र सुरक्षेच्या दृष्टीने खबरदारीचे उपाय म्हणून लोक न्यायालय स्थगित करण्यात आले आहे. त्यामुळे ज्या पक्षकारांनी लोक न्यायालयात खटले चालविले जाणार असतील त्यांनी शनिवारी लोक न्यायालय होणार नसल्याची नोंद घ्यावी, असे आवाहन तालुका विधी सेवा प्राधिकरणाद्वारे कळविण्यात आले आहे.