भुसावळ स्टेट बँकेची फसवणूक : सहा आरोपींना 28 पर्यंत पोलीस कोठडी

भुसावळ : शहरातील जामनेर रोडवरील आनंद नगरात असलेल्या स्टेट बँक शाखेची कर्ज वाटपात तब्बल दिड कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात सहा कर्जदारांना रविवारी पोलिसांनी विशेष मोहिम राबवून अटक केली होती. आरोपींना सोमवारी भुसावळ न्यायालयात हजर केले असता त्यांना 28 ऑक्टोबरपर्यंत तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. बोगस कर्ज वाटपाबाबत वरीष्ठ स्तरावर तक्रारी करण्यात आल्यानंतर वरीष्ठ स्तरावरून चौकशीअंती कर्जदार, व्हॅल्यूअरसह 17 जणांविरोधात बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या आरोपींची कोठडीत रवानगी
पोलिसांनी रविवारी राजेश निवृत्ती मेहरे, शकील इमाम गवळी, आसीफ हुसेन गवळी, गजानन रमेश शिंपी, निलेश जय सपकाळे, पंकज भोजनराव देशमुख यांना अटक केली होती. आरोपींना सोमवारी न्यायालयात हजर केले असता त्यांना तीन दिवसांची अर्थात 28 ऑक्टोंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. तपास बाजारपेठ पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Copy