भुसावळ- सुरत पॅसेंजर नऊ दिवसांसाठी रद्द

0

भुसावळ  । मध्य रेल्वे विभागातील भुसावळ- उधना – जळगाव रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण होत असल्याने चिंचखेडा – नंदुरबार खंडात काम केले जाणार आहे. गाडी क्रमांक 59013 सुरत- भुसावळ पॅसेंजर 8 ते 16 फेब्रुवारी दरम्यान रद्द करण्यात आली आली असल्याची माहिती रेल्वे प्रशासनातर्फे देण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांसह चाकरमान्यांचे हाल होणार असून त्यांना या वेळेत आपल्या इच्छितस्थळी प्रवास करण्यासाठी बस किंवा खाजगी प्रवासी वाहतुकीची मदत घ्यावी लागणार आहे.

बारडोली आणि ब्यारा स्थानकांना तात्पुरते स्वरुपात अतिरिक्त थांबे

गाडी क्रमांक 59014 भुसावळ सुरत पॅसेंजर 9 ते 7 फेब्रुवारी पर्यंत रद्द, गाडी क्रमांक 59025 सुरत- अमरावती फास्ट पॅसेंजर 9, 10, 12 आणि 16 फेब्रुवारीला रद्द करण्यात आली आहे. तसेच गाडी क्रमांक 59026 अमरावती – सुरत फास्ट पॅसेंजर ही 10, 11, 13 आणि 17 रोज रद्द करण्यात आली आहे. बारडोली आणि ब्यारा स्थानकांना अतिरिक्त थांबे तात्पुरते स्वरुपात देण्यात आले आहेत. यात गाडी क्रमांक 18402 ओखापुरी एक्सप्रेसला 8 आणि 15 फेब्रुवारी, गाडी क्रमांक 12844 अमदाबाद -पुरी एक्सप्रेस 9, 11, 12, 13 आणि 16 फेब्रुवारी, गाडी क्रमांक 12406 अमदाबाद – पुरी एक्सप्रेस 10 फेब्रुवारी, गाडी क्रमांक 16501 अहमदाबाद -बैंगलोर एक्सप्रेस 14 फेब्रुवारी, गाडी क्रमांक 12843 पुरी-अहमदाबाद एक्सप्रेस 9, 11, 12, 13 आणि 16 फेब्रुवारी, गाडी क्रमांक 18405 पुरी- अहमदाबाद एक्सप्रेस 10 व 17 फेब्रुवारी, गाडी क्रमांक 22827 पुरी- सुरत सुपरफास्ट एक्सप्रेस 14 फेब्रुवारी व गाडी क्रमांक 12994 पुरी-गांधीधाम एक्सप्रेस 15 फेब्रुवारी रोजी अतिरिक्त थांब्यांच्या ठिकाणी थांबणार आहे.