भुसावळ संविधान बचाओ समितीचे धरणे आंदोलन तात्पुरते स्थगीत

0

भुसावळ- शहरात संविधान बचाओ समितीतर्फे सीएए, एनपीआर व एनआरसीच्या विरोधात गेल्या 50 दिवसांपासून तहसील कार्यालयासमोर सुरू असलेले साखळी उपोषण काही तांत्रीक कारणामुळे तहसीलदार दीपक धीवरे यांना निवेदन देऊन तात्पुरते स्थगीत करण्यात आले. पुढील दिशा, विचार विमर्श व न्यायालयीन निर्णयानंतर आंदोलनाबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.

सहकार्याबद्दल आयोजकांनी मानले आभार
या धरणे आंदोलनाला भुसावळ शहरातील सर्व धर्मीय बांधवांनी या आंदोलनाला पाठिंबा देऊन तसेच पोलिस प्रशासन, महसूल विभाग, मिडीयाने सहकार्य केल्याबद्दल संविधान बचाओ समितीने आभार मानले आहेत. या आंदोलनाच्या 50 व्या दिवशी संविधान बचाओ समितीचे अध्यक्ष सलिमसेठ चुडीवाले, साबीर शेख, मो.मुनव्वर खान, नगरसेवक सलीम पिंजारी, युनूस मामा, दानीश पटेल, ईमरान खान, डॉ.ईमरान, अजहर शेख, मजहर शेख, अशरफ कुरेशी, जुनेद खान, मो.रईस, रऊफ ठेकेदार, अकबर सर, ईब्राहीम खान, आबीद भाई, शैलेंद्र नन्नवरे, साबीर शेख, तौसीफ कुरेशी, वासेफ यांच्यासह अनेक मान्यवर, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.