Private Advt

भुसावळ शहर व तालुक्यात आज आमदार सावकारेंच्या वाढदिवसानिमित्त भरगच्च कार्यक्रम

भुसावळावर आता ‘तिसर्‍या डोळ्याची नजर’ ः आमदार मित्र मंडळातर्फे शहरात लागणार सीसीटीव्ही कॅमेरे

भुसावळ :  भुसावळचे लोकप्रिय आमदार संजय सावकारे यांचा शनिवार, 11 रोजी वाढदिवस असल्याने वाढदिवसाला जाहिरात तसेच बॅनरबाजी तसेच अन्य अनावश्यक खर्चाला फाटा देत भुसावळ शहरवासीयांच्या सुरक्षेसाठी महत्वाचे असलेचे सीसीटीव्ही कॅमेरे शहरातील वर्दळीच्या भागात लावण्याचा व पोलिस प्रशासनाला सहकार्य करण्याचा स्तुत्य निर्णय आमदार संजय सावकारे मित्र मंडळाने घेतला आहे. दरम्यान, आमदार सावकारे यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवारी दिवसभर शहर व ग्रामीणमध्ये भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

शहरावर राहणार आता तिसर्‍या डोळ्याचा वॉच
आमदार सावकारे मित्र मंडळाने वाढदिवसाला अनावश्यक बाबींवर खर्च टाळण्याचा निर्णय घेत शहरवासीयांसाठी अतिआवश्यक असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचा निर्णय घेतला आहे. या माध्यमातून पोलिस प्रशासनालादेखील मोठी मदत होणार असून अप्रिय घटना रोखण्यासह एखादी घटना घडल्यानंतर ती उघडकीस आणणे सुलभ होणार आहे. आमदारांच्या उपस्थितीत शनिवारी हे सीसीटीव्ही कॅमेरे पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांना सुपूर्द केले जाणार आहेत. दरम्यान, भुसावळ ट्रामा केअर सेंटरला दैनंदीन वापरासाठी लागणार्‍या लाखो रुपयांच्या औषधासह अन्य सर्जिकल साहित्याचे वाटपही आमदार मित्र मंडळातर्फे करण्यात येणार आहे.

स्टार लॉनमध्ये आमदार करणार शुभेच्छांचा स्वीकार
वांजोळा रोडवरील स्टार लॉन, राजवाडा येथे शनिवारी सायंकाळी सात वाजता आमदार संजय सावकारे हे शहर व तालुक्यातील स्नेहीजणांकडून शुभेच्छांचा स्वीकार करणार आहे. यावेळी आमदार मित्र मंडळातर्फे आमदारांचा वाढदिवसानिमित्त भव्य सत्कारही करण्यात येणार आहे. स्नेहीजणांसाठी कार्यक्रमानंतर जेवणाची व्यवस्थाही करण्यात आली आहे.

दिवसभर शहर व ग्रामीणमध्ये भरगच्च कार्यक्रम
आमदार सावकारे यांच्या वाढदिवसानिमित्त भुसावळ शहर व ग्रामीणमध्ये शनिवारी दिवसभर भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. भाजपा शहराध्यक्ष परीक्षीत बर्‍हाटे यांच्या निवासस्थानी शनिवारी सकाळी 9.30 वाजता म्युन्सीपल पार्कमध्ये नागरीकांना आरोग्य कार्डचे वाटप, सकाळी 10 वाजता भुसावळातील ट्रामा केअर सेंटरमध्ये भारतीय जनता पार्टी वैद्यकीय आघाडीतर्फे रक्तदान शिबिर, सकाळी 10.30 वाजता हतनूर गावासाठी शुद्ध पाणीपुरवठा करणार्‍या आर.ओ.प्रणालीचे लोकार्पण, सकाळी 11 वाजता तळवेल येथे म्हाळसा देवी मंदिरासमोर सभा मंडपाचे भूमिपूजन, सकाळी 11.30 वाजता आचेगाव येथे अंतर्गत रस्ते व पेव्हर ब्लॉक बसवण्याच्या कामाचे उद्घाटन, दुपारी 12 वाजता तळवेल फाटा येथील साईबाबा मंदिरावर आरती, दुपारी 12.30 वाजता बोहर्डी येथे सभा मंडपाचे भूमिपूजन, दुपारी दोन वाजता टिंबर मार्केटजवळील अंडरपासजवळ काँक्रिटीकरण कामाचे उद्घाटन तसेच श्री नगर व विद्यानगराला जोडणार्‍या पुलाचे लोकार्पण, वृद्ध महिलांना साडी वाटप, दुपारी अडीच वाजता मोहित नगरात डांबरीकरणाचा शुभारंभ, दुपारी तीन वाजता नवीन नगरपालिकेजवळील श्री गजानन महाराज नगरात काँक्रिटीकरणाचा शुभारंभ तसेच लहुलीला व वसुंधरा नगरात डांबरीकरणाचा शुभारंभ, दुपारी साडेतीन वाजता मामाजी टॉकीज रोडवर ई श्रम कार्ड व आरोग्य कार्ड, गमाडीया प्रेस रस्ता कामाचे भूमिपूजन तसेच दुपारी चार वाजता काळा हनुमान मंदिराजवळ पेव्हर ब्लॉक बसवण्याच्या कामाचे उद्घाटन, दुपारी साडेचार वाजता गांधी व गडकरी नगरात विकासकामांचे लोकार्पण, दुपारी पाच वाजता सर्वे क्रमांक 117/3 मध्ये व्यायामशाळा कामाचे लोकार्पण, सायंकाळी साडेपाच वाजता श्रीहरी नगरात पेव्हर ब्लॉक बसवण्याच्या कामाचा शुभारंभ, सायंकाळी सहा वाजता स्व.मोहन पहेलवान चौक, मोहन बारसे नगर, बुद्धविहाराजवळ आरोग्य व ई श्रम कार्ड वाटप आदी कार्यक्रम होतील. नागरीकांनी सोशल डिस्टन्सचे पालन करीत कार्यक्रमांना उपस्थिती द्यावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.