भुसावळ शहरात आणखी पाच जणांना कोरोनाची लागण

0

जळगाव – जिल्ह्यातील भुसावळ व भडगाव येथील स्वॅब घेतलेल्या संशयित कोरोना व्यक्तीपैकी 30 व्यक्तींचे तपासणी अहवाल नुकतेच प्राप्त झाले असून त्यापैकी 24 व्यक्तींचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर *पाच* व्यक्तीचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले असून एका व्यक्तीचा पुर्नतपासणी अहवालही पाॅझिटिव्ह आला आहे.

पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्ती भुसावळ शहरातील फालक नगर, गुंजाळ काॅलनी, गांधीनगर
व दिपनगरातील आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या 455 इतकी झाली आहे. अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे.

Copy