भुसावळ शहरातून दुचाकी लांबवली

भुसावळ : शहरातील स्टेशन रोडवरील अमर वाईनसमोरून अज्ञात चोरट्यांनी 15 हजार रुपये किंमतीची दुचाकी लांबवली. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

चोरट्यांची टोळी सक्रिय
तक्रारदार अलताफ खलील खाटीक (18, जुना सातारा, गवळीवाडा, भुसावळ) 2 रोजी रात्री स्टेशन रोडवरील अमर वाईनसमोर त्यांची 15 हजार रुपये किंमतीची फॅशन प्लस दुचाकी (एम.एच.19 ए.आर.5459) लांबवली. तपास हवालदार जितू पाटील करीत आहेत.