Private Advt

भुसावळ शहरातील महिलेस मारहाण : तिघांविरोधात बाजारपेठ पोलिसात गुन्हा

भुसावळ : अंगणात झाडू मारत असलेल्या महिलेस जुन्या वादातून तिघांनी बेद मारहाण करीत शिविगाळ केली. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

तिघांविरोधात गुन्हा दाखल
शहरातील बुध्द विहारामागील गांधी नगर भागात गुरुवार, 12 मे रोजी सकाळी 11.30 वाजता रोमा प्रमोद चौबे या त्यांच्या घराच्या बाहेर झाडू मारत असतांना संशयीत जाहेद शेख इब्राहीम यांनी चौबे यांना जुन्या भांडणाच्या कारणावरून शिविगाळ करीत अंगावर पाणी फेकले. याचा जाब चौबे यांनी विचारला असता खालीद शेख इब्राहीम व जुबेर शेख इब्राहीम (रा.गांधी नगर, भुसावळ)यांनी महिलेचे केस ओढले तसेच तुझा गळा कापून तुला फेकून देईल, अशी धमकी दिली. जाहेद शेख यांनी त्यांच्या हातातील लोखंडी सळईने चौबे यांच्या पायावर व मांडीवर व उजव्या हाताच्या मनगटावर मारून जखमी केले. जुबेर यांनी चापटा-बुक्यांनी मारहाण केली. पोलिस निरीक्षक विलास शेंडे यांनी घटनास्थळी भेट दिली. हवालदार विजय नेरकर हे पुढील तपास करीत आहे.