Private Advt

भुसावळ शहरचे नूतन निरीक्षक गजानन पडघण तर बाजारपेठला राहुल गायकवाड येणार

भुसावळ बाजारपेठसह शहर पोलिस ठाण्याच्या निरीक्षकांसह जिल्ह्यातील सहा निरीक्षकांच्या बदल्या

भुसावळ : जळगाव जिल्हा पोलिस दलातील सहा पोलिस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश बुधवार, 20 रोजी जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी काढले असून त्यात भुसावळ शहर व बाजारपेठ पोलिस ठाण्यातील निरीक्षकांचा समावेश आहे. विशेष म्हणजे भुसावळातील दोन्ही अधिकार्‍यांची कामगिरी समाधानकारक असतानाही त्यांची अचानक तडकाफडकी बदली करण्यात आल्याने आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, काही अधिकार्‍यांच्या बदल्या रीक्त पदांवर करण्यात आल्या आहेत.

भुसावळात एकाचवेळी दोन प्रभारी अधिकार्‍यांच्या बदल्या
भुसावळ शहर पोलिस ठाण्याच्या नूतन निरीक्षकपदी गजानन पडघण तर बाजारपेठचे नूतन निरीक्षक राहुल गायकवाड बदलून येत आहेत तर शहरचे निरीक्षक प्रताप इंगळे यांना पहुर पोलिस ठाण्यात तर बाजारपेठचे निरीक्षक दिलीप भागवत यांना जळगाव आर्थिक गुन्हे शाखेत नेमणूक देण्यात आली आहे.

या अधिकार्‍यांच्या झाल्या बदल्या

पहुर पोलिस ठाण्याचे निरीक्षक अरुण धनवडे यांची कसुरीवरून नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे.

भुसावळ शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक प्रताप इंगळे यांची पहुर पोलिस ठाण्यात बदली करण्यात आली.

जळगाव आर्थिक गुन्हे शाखेचे गजानन लक्ष्मण पडघण यांची भुसावळ शहर पोलिस निरीक्षकपदी बदली करण्यात आली.

भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षक दिलीप पांडुरंग भागवत यांची जळगाव आर्थिक गुन्हे शाखेच्या निरीक्षकपदी बदली करण्यात आली.

बोदवड पोलिस ठाण्याचे निरीक्षकपदी राहुल गायकवाड यांची भुसावळ बाजारपेठच्या निरीक्षकपदी बदली करण्यात आली.

जळगाव नियंत्रण कक्षाचे राजेंद्र पंढरीनाथ गुंजाळ यांची बोदवड निरीक्षकपदी बदली करण्यात आली आहे.