भुसावळ विभागात भाजपचे रस्ता रोको आंदोलन

0

भुसावळ : कोरोनासारख्या जागतिक महामारीच्या संकटात शेतकरी बांधवांनी जीव धोक्यात घालुन जीवनावश्यक दुध उत्पादनाचे काम सुरू ठेवले असलेतरी सद्यस्थितीत दुधाचे भाव राज्य सरकारने अतिशय कमी केले आहेत, उत्पादन खर्च सुध्दा निघत नाही आहे आणि अशातच महाराष्ट्र शासनाने दुध उत्पादकांना मिळणारे अनुदान ही बंद केल्याच्या निषेधार्थ व शेतकरी बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी भारतीय जनता पार्टीकडून भुसावळ विभागात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. आंदोलनामुळे काही वेळ वाहतूक ठप्प झाली होती तर आंदोलकांनी राज्य सरकारच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त राखला.

दूध दरवाढीसाठी भुसावळात भाजपचे आंदोलन
भुसावळ : दुध उत्पादकांना सरसकट 10 रुपये प्रति लिटर व दुध पावडरला प्रति किलो 50 रुपये अनुदान मिळणेबाबत राज्य शासनाकडे मागणी करूनही दखल न घेण्यात आल्याने भाजपा पदाधिकार्‍यांनी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील नाहाटा चौफुलीवर शनिवारी सकाळी 11 वाजता रास्ता रोको आंदोलन करीत सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. आंदोलनामुळे चारही बाजूची वाहतूक काही वेळासाठी ठप्प झाली. बाजारपेठ पोलिसांनी याप्रसंगी चोख बंदोबस्त राखला.

यांचा आंदोलनात सहभाग
या आंदोलनात आमदार संजय सावकारे, नगराध्यक्ष रमण भोळे, भाजप जिल्हा सरचिटणीस तथा नगरसेवक प्रा.सुनील नेवे, महायुतीचे पप्पू सुरळकर, भाजपा शहराध्यक्ष दिनेश नेमाडे, सरचिटणीस पवन बुंदेले, अमोल महाजन, नगरसेवक पुरुषोत्तम नारखेडे, किशोर पाटील, गिरीश महाजन, अजय नागराणी, सतीश सपकाळे, राजेंद्र चौधरी, महायुतीचे पदाधिकारी प्रा.प्रशांत पाटील, विशाल जंगले, राजु खरारे, नारायण रणधीर, माजी सभापती सुनील महाजन, संजय पाटील, माजी उपसभापती गोलु पाटील, ग्रामीण सरचिटणीस दिलीप कोळी, प्रमोद पाटील, अर्जुन खरारे, भाजप युवा मोर्चाचे अनिरुद्ध कुलकर्णी, चेतन बोरोले आणि महायुतीचे कार्यकर्ते तसेच अन्य नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले.

Copy