भुसावळ विभागात क्यूआर कोडद्वारे कॉन्टॅक्टलेस तिकिट तपासणी

0

भुसावळ : प्रवासी आणि तिकिट पर्यवेक्षक (टीटीई) कोविड -19 साथीच्या प्रसारापासून वाचविण्यासाठी आता भुसावळ विभागात नवीन पर्याय सुरू करण्यात आला आहे. त्याअंतर्गत आरक्षण खिडकीवर तिकिट बुकिंग करताना प्रवाशांना त्यांचा मोबाईल क्रमांक द्यावा लागेल. मोबाईलवर क्यूआर कोडसाठी यूआरएल लिंक देण्यात येईल. टीटीईच्या मागणीनुसार जेव्हा प्रवासी या यूआरएलचा लिंकला क्लिक केल्यानंतर मोबाइल स्क्रीनवर क्यूआर कोड दिसून येईल. हा क्यूआर कोड टीटीई द्वारे त्याच्या मोबाइलवर तिकिट तपासणीसाठी स्कॅन केला जाईल जेणेकरुन टीटीईला मोबाइलवर आरक्षणाची संपूर्ण माहिती मिळेल. या सुविधेचा मुख्य उद्देश सामाजिक अंतर राखून तिकिटांची तपासणी करणे आहे. प्रवाश्याच्या तिकिटाला स्पर्श न करता टीटीई आरक्षण तिकिट तपासू शकणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने कळवले आहे.

Copy